सोयाबीनला आता ६ हजार रुपये हमीभाव मिळणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा ; चिखली मतदारसंघात शेतकऱ्यांकडून उत्साही स्वागत




चिखली /( हरीभाऊ परिहार ) : विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यभर जोरात वाहत आहेत, आणि चिखली मतदारसंघही त्यापासून दूर नाही. येथील कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले सलग दुसऱ्यांदा जनमताचा कौल जिंकण्यासाठी प्रचार करत असून, त्यांना मतदारांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये हमीभाव देण्याची घोषणा केल्यानंतर चिखलीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे. शेतकऱ्यांच्या या समर्थनामुळे श्वेताताईंना निश्चितच राजकीय फायदा होईल, आणि महायुतीला मिळालेल्या या 'बूस्टर डोस'मुळे त्यांचा विजय अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी मोदी यांनी, देशातील शेतकऱ्याला आम्हाला सशक्त बनवायचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असून सत्ता द्या, महायुतीने सोयाबीन शेतकऱ्यांना ६ हजार हमीभाव देण्याचे वचन दिल्याचे सांगितले. केंद्रातील मोदी  सरकार  शेतकऱ्यांना किसान शेतकरी सन्मान योजना देत असून  आता महायुतीने देखील नमो शेतकरी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना १२ हजार मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारकडून मिळत असून आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव देखील मिळणार असल्याने  शेतकऱ्यांच्या आनंदात आणखी भर पडली आहे. 

     

काँग्रेसच्या अपप्रचाराला मिळाले चोख प्रत्त्युत्तर


         विधानसभा निवडणुकीदरम्यान गावोगावी श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकास कामांचा गौरवा सुरू आहे. त्यामुळे विरोधी उमेदवार असलेल्या महाआघाडी मधील काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा  पोटशुळ उठत असून त्यांच्याकडून शेतकरी  वर्गाची दिशाभूल सातत्याने केली जात होती. भाजपा सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे  नॅरेटिव्ह पसरवले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव  देण्याचा शब्द दिल्यामुळे काँग्रेसच्या या अपप्रचाराला आता चोख प्रतिउत्तर मिळाले असून शेतकरी वर्गाचा मोठा कल आ. श्वेताताई महाले यांच्याकडे झुकल्याचे पाहायला मिळत असून महायुतीसाठी हा एक मोठा बूस्टर डोस मानला जात आहे.

Post a Comment

0 Comments