डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या पराभूत करून काँग्रेसला धडा शिकवा - भाई विजय गवई

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या राहुल बोंद्रेला पराभूत करा 

भाई विजय गवईंचे काँग्रेसला धडा शिकवण्याचे आवाहन




चिखली /( द  बातमीवाला ): भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सदोदित अपमानच केला. इतिहासात याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, चिखली मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक उमेदवाराने आपल्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या अवमानाचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर दाखवून दिले आहे. संविधान निर्मात्याचा अशाप्रकारे अवमान करणाऱ्या राहुल बोंद्रे यांना पराभूत करून काँग्रेसला योग्य तो  धडा शिकवा असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी केले. दि. ५  नोव्हेंबर रोजी आयोजित आ. श्वेताताई महाले यांच्या भेटीगाठी दौऱ्या दरम्यान उपस्थितांसमोर भाषण करताना ते बोलत होते. 
                महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ गावभेटी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या दौऱ्या दरम्यान आ. महाले यांनी सवना, वळती, पळसखेड जयंती, मालगणी, सावरगाव डुकरे, हातनी, सातगाव भुसारी, सोनेवाडी, अंत्री तेली, कोलारी आणि साखळी बु  या गावांना भेटी देऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रत्येक गावामध्ये पार पडलेल्या कोपरा सभेला ग्रामस्थ, शेतकरी, तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती. 

काँग्रेसचे संविधान प्रेम खोटे - भाई विजय गवई 



 

       सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलण्याचे फेक नॅरेटिव्ह  चालवून दलित समाजाची दिशाभूल करत मते घेतली. हेच काँग्रेसवाले चिखली मतदारसंघात मात्र संविधानविरोधी काम करण्याची एकही संधी सोडत नाहीत असा आरोप भाई विजय गवई यांनी केला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार  व जिल्हाध्यक्ष  यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे पैसे हडपले, अनेक सरकारी योजनांचा गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी केला. यावरून काँग्रेसचे संविधान प्रेम खोटे असल्याचे स्पष्ट होते असे  गवई म्हणाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दलितांची  दिशाभूल करण्यासाठी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांचा पणतू म्हणून ज्या व्यक्तीला मतदारसंघात खेडोपाडी दलित वस्त्यांमध्ये फिरवले जात आहे त्या व्यक्तीच्या तोंडून राहुल बोंद्रे यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट  वाचून दाखवली जाते. अशा प्रकारे  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा  वापर करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधने  हा बाबासाहेबांचा अवमान असल्याची टीका विजय गवई यांनी केली. 


जनसेवेच्या कार्यासाठी पुन्हा आशीर्वाद लाभू द्या - आ. श्वेताताई महाले




             राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा व आपल्या परिसराचा विकास करण्याची संधी मला मागील पाच वर्षात तुम्ही दिली त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. हे ऋण फेडण्याचा प्रयत्न मी गेल्या अडीच वर्षात विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रयत्नाला अधिक बळ मिळावे आणि येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक चांगली जनसेवा करता यावी यासाठी पुन्हा तुमचे मतदान रुपी  आशीर्वाद लाभूद्या अशी विनंती या  भेटीगाठी दौऱ्यादरम्यान आ. श्वेताताई महाले यांनी ग्रामीण भागातील मतदारांना केली.


Post a Comment

0 Comments