चिखली विधानसभा निवडणुकीत प्रशांत ढोरे पाटील यांच्या 'पाना' चिन्हावर चर्चा !
महाविकास आघाडी की महायुतीला देणार धक्का ?
चिखली/( द बातमीवाला ) - चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत, पण सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत एक अपक्ष उमेदवारावर – शेतकरी चळवळीचे झुंजार नेते, युवा मराठा समाजाचे नेते, आणि अपक्ष उमेदवार प्रशांत ढोरे पाटील यांच्यावर. त्यांना निवडणुकीसाठी 'पाना' (स्पनर) हे चिन्ह मिळालं आहे, ज्यामुळे त्यांचा प्रचार आत्तापासूनच चर्चेचा विषय बनला आहे.
गत काही महिन्यापूर्वी बुलढाणा लोकसभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अपक्ष उमेदवारी लढताना 'पाना' चिन्ह घेतलं आणि त्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे उमेदवार यांचे नट बोल्ड ढिले करीत अडीच लाख मतदान मिळवले होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवाराचा पराभव झाला होता. अपक्ष उमेदवार प्रशांत ढोरे पाटील यांच्या पाना चिन्हावर चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना किती जड जाणार, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
पाना चिन्हावर उमेदवारी लढवणारे नेते शेतकरी हितासाठी लढण्याचे वचन देत असले तरी, या चिन्हावर असलेल्या राजकीय वजनामुळे चिखलीत होणारा राजकीय संघर्ष आता रंगत दाखवतोय. प्रशांत ढोरे पाटील हे महायुतीच्या की महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे 'नट-बोल्ट ढिले' करणार की कसणार असे तर्क-वितर्क आहेत . तर त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी ही लढाई एका महत्त्वाच्या टर्निंग पॉईंट म्हणून पाहण्याची शक्यता आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये 'पाना' चिन्ह किती प्रभावी ठरेल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना त्याचा काय परिणाम होईल, यावर राजकारणाचे लक्ष लागले आहे.
0 Comments