बुलडाणा-लोणार येथे उद्धव ठाकरे यांची "ठाकरी तोफ" धडाडणार !

 जयश्रीताई शेळके, सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुखांची उद्या ८ नोव्हेंबरला जाहीर सभा





बुलडाणा /( द बातमीवाला) :- शिवसेना उबाठा गड  म्हणून बुलडाणा, मेहकरची ओळख आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यसाठी ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कुठल्याही परिस्थितीत या दोन्ही जागा आपल्याकडे ओढून आणायच्या असा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेनेचा गड शाबूत ठेवण्यासाठी आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या दि. ८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा व लोणार येथे सभा घेणार आहेत. यावेळी त्यांची "ठाकरी तोफ" विरोधकांवर चांगलीच धडाडणार आहे.




     








उद्धव ठाकरेंची पहिली सभा उद्या दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वाजता बुलडाणा येथे तर दुसरी सायंकाळी २ वाजता लोणार मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभांची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू आहे.
बुलडाणा हा शिवसेनेचा गड मानला जात असला तरी पक्षाकडून महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली नव्हती. परंतु यावेळी प्रथम तब्बल ३५ वर्षांनी जयश्रीताई शेळके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. जयश्रीताई यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे. इलेक्टिव्ह मेरिटमध्ये त्या फिट्ट बसतात. त्यामुळे महाविकास आघाडीने एकमताने त्यांच्या नावाला पसंती दिली. बुलडाणा विधानसभा निवडणुकीत त्या शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. समोर शिंदे गटाचे तुल्यबळ उमेदवार संजय गायकवाड यांचे आव्हान असल्याने त्यांना शह देण्याची क्षमता केवळ जयश्रीताई शेळके यांच्याकडे असल्याचे मविआच्या लक्षात आले. शिवसेना (उबाठा) पक्षात महिलांचा सन्मान केला जातो, त्यामुळे महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. जयश्रीताई शेळके निवडून आल्यास जिल्ह्यातील शिवसेनेच्या पहिल्या आमदार असतील. हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी उबाठा आणि एकूणच महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.
   

Post a Comment

0 Comments