"श्वेताताईंना मत म्हणजे भ्रष्टाचार मुक्त विकासाला मत" – प्रकाश महाराज जवंजाळ

"श्वेताताई महाले यांचे नेतृत्व म्हणजे प्रत्येक मतदाराच्या भविष्यासाठी आशा" – इसोली प्रचारसभेत एकसंध उत्साह



चिखली / ( गोपाल  वाळेकर ) : सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उन्नती घडवणारा खराखुरा विकास म्हणजे काय असतो या त्याचा अनुभव चिखली मतदारसंघातील जनतेने या अडीच वर्षात श्वेताताई महाले यांच्या धडाकेबाज विकासकार्यातून घेतला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चिखली शहर आणि ग्रामीण भागात जात, धर्म, पक्ष कसलाही भेदभाव न करता भ्रष्टाचार मुक्त विकास हेच ध्येय ठेवून आ. श्वेताताई महाले यांनी कार्य केले. त्याची परतफेड म्हणून श्वेताताईंना मतांनी विजयी करा, कारण श्वेताताईंना मत म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त विकासाला मत होय असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ह.भ. प प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. दि. ६ नोव्हेंबर रोजी इसोली  येथे आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 



                  भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, परिपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ दि. ६  नोव्हेंबर रोजी आयोजित  गाव भेट दौऱ्यादरम्यान इसोली येथे प्रचार सभेचे  आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी या दौऱ्याचा समारोप  इसोली येथील सभेने झाला.  आ. श्वेताताई महाले  यांच्यासह प्रकाश महाराज जवंजाळ, पीरिपाचे  जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई आणि भाजपा अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख अनीस यांची या सभेमध्ये भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन सरपंच माणिकराव खरात यांनी केले तर प्राचार्य समाधान शेळके यांनी आभार मानले. 



श्वेताताईनी केलेली विकासकामे लक्षात ठेऊन  मतदान करा - शेख अनीस

             काँग्रेसचे उमेदवार असलेल्या माजी आमदारांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात या  मतदारसंघाला मागास ठेवण्याचे पाप केले. परंतु, आ. श्वेताताई  महाले यांनी केवळ अडीच वर्षातच चिखली मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागाचे रूप पालटले, अनेक विकासकामे मार्गी लावत असतानाच त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचे सुद्धा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यामुळे त्यांची ही सर्व कामगिरी लक्षात ठेवून पुन्हा श्वेताताईंना विजयी करण्यासाठी मतदान करा असे आवाहन यावेळी आपल्या भाषणातून शेख अनिस यांनी केले. 

मंजूर केलेली कामे मार्गी लावून  नवीन विकासकामांसाठी पुन्हा संधी द्या -  श्वेताताई महाले





       माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातील पहिली अडीच वर्षे मविआ सरकारच्या विकास विरोधी धोरणामुळे अक्षरशः वाया गेली. त्यानंतर आलेल्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थाने विकास निधी प्राप्त झाला आणि माझ्या प्रयत्नांना फळ आले आणि  म्हणूनच चिखली मतदारसंघाच्या विकासामध्ये मी भर घालू शकले. कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत शहर व ग्रामीण भागात जास्तीतजास्त कामे करण्याचा प्रयत्न मी केला.  यामधील बहुतांश कामे पूर्ण झाली असून काही कामे लवकरच पूर्णत्वास जात आहेत. या कामांना पूर्ण करण्यासाठी व नवीन विकासकामे आणून मतदारसंघाच्या  प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी मला पुन्हा एक वार मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले.

Post a Comment

0 Comments