"शरद पवार साहेबांवरील वैयक्तिक टीका महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी – रेखाताई खेडेकर"

"शरद पवार साहेब यांच्यावरील वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही" :- रेखाताई खेडेकर



बुलढाणा /( द बातमीवाला) : सदाभाऊ खोत यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली आहे. त्या टीकेला बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष सौ. रेखाताई खेडेकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी अशी टीका नसल्याचे म्हटले असून, ती निंदनीय असल्याचा ठपका ठेवला आहे.

"संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची अशोभनीय टिप्पणी केली आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मुळीच साजेशी नाही. शरदचंद्र पवार साहेबांवर अशी वैयक्तिक टीका करणे अत्यंत अशोभनीय आहे," असे सौ. रेखाताई खेडेकर म्हणाल्या. त्याच वेळी त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेबांवर आणखी कोणतीही वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही. त्यासाठी आम्ही संवेधानिक मार्गाने तीव्र आंदोलन सुरू करू," असे त्यांनी खूपच ठामपणे सांगितले. 

सौ. खेडेकर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, की असंवेदनशील व अपशब्द वापरून व्यक्तीगत टीका करणे हे पौरुष व मर्यादेचे उल्लंघन करणारे आहे. "आदरणीय पवार साहेबांच्या कामगिरीला, त्यांच्या नेतृत्वाला आणि समाजासाठी केलेल्या योगदानाला महाराष्ट्रातील जनतेचा आदर आहे. त्यांना अशा प्रकारे लक्ष्य करणे हे त्यांचा अपमान करणारे आहे," असे सौ. खेडेकर म्हणाल्या. 

Post a Comment

0 Comments