"द बातमीवाला" ; एक लाख पार..!

"द बातमीवाला" वेब पोर्टल : एक लाख वाचकांचा टप्पा गाठून लोकप्रियतेचा नवा अध्याय !



डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या ‘द बातमीवाला’ वेब पोर्टलने अवघ्या अल्प कालावधीत एक लाख वाचकांचा मोठा टप्पा गाठला आहे. अचूक आणि ताज्या घडामोडींच्या बातम्यांसाठी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, द बातमीवाला हे डिजिटल मीडियातील एक विश्वसनीय नाव बनले आहे.                         ‘द बातमीवाला’ वेब पोर्टलने ताज्या बातम्या, गुन्हे विश्व, राजरंग, शेत शिवार, तसेच इतर अनेक विषयांवर अचूक आणि समर्पक माहिती देत वाचकांना आकर्षित केले आहे. विविध क्षेत्रांतील घडामोडी व सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून वाचकांची मने जिंकणाऱ्या या पोर्टलने डिजिटल मीडियामध्ये नवी उंची गाठली आहे.            एक लाख वाचकांचा टप्पा गाठणे ही केवळ संख्या नसून वाचकांचा मिळालेला विश्वास आहे. सातत्यपूर्ण अद्यतन, दर्जेदार बातम्या, आणि वाचकांसाठी उपयोगी माहिती पुरवण्याचा प्रयत्न या यशामागील मुख्य कारण ठरला आहे. यापुढेही ‘द बातमीवाला’ वाचकांसाठी नवनवीन माहिती देत राहणार असून, डिजिटल मीडियाच्या क्रांतीत आपली ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहोत.


वाचकांचा विश्वास आणि पाठिंबा : ‘द बातमीवाला’च्या यशाचा आधार : संपादक छोटू कांबळे 

‘द बातमीवाला’ वेब पोर्टलने आपल्या विश्वासू वाचकांच्या पाठिंब्यामुळे अवघ्या काही महिन्यांत एक लाख वाचकांचा टप्पा गाठला आहे. हे यश आमच्यासाठी अभिमानाचा विषय असून, वाचकांच्या प्रेमाशिवाय हे शक्य झाले नसते. वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळेच आम्ही आज डिजिटल मीडियाच्या या प्रवासात पुढे वाटचाल करू शकलो आहोत. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रोत्साहन, आणि विश्वास आम्हाला अधिक प्रेरणा देतो. ‘द बातमीवाला’ वेब पोर्टलचे हे यश वाचकांसाठी आणि वाचकांमुळेच आहे. आम्हाला खंबीर साथ देणाऱ्या आपल्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार! आपली साथ अशीच कायम राहो, हीच अपेक्षा. वाचकांच्या विश्वासाला धरून ठेवण्याचे आणि उत्तम सेवा देण्याचे आमचे वचन कायम राहील.

तुमच्यामुळेच आम्ही आहोत – धन्यवाद !

आपलाच आभारकर्ता : भाई छोटू कांबळे          मुख्य संपादक : द बातमीवाला



Post a Comment

0 Comments