बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सरपंचपदाचे महिला आरक्षण जाहीर !
जिल्ह्यातील आरक्षणामुळे महिला सक्षमीकरणाला चालना
चिखली/( छोटू कांबळे ) : बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तालुकानिहाय आरक्षणाची माहिती खालील प्रमाणे...
* बुलढाणा तालुका : एकूण ६६ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला - ६, अनुसूचित जमाती - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ९, सर्वसाधारण महिला - १६.
* चिखली तालुका : एकूण ९९ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला - ११, अनुसूचित जमाती - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - १३, सर्वसाधारण महिला - २४.
* मेहकर तालुका : एकूण ९८ ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला - ११, अनुसूचित जमाती - ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग - १०, सर्वसाधारण महिला - २५.
* लोणार तालुका : एकूण ६० ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला - ५, अनुसूचित जमाती - १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - ८, सर्वसाधारण महिला - १६.
* सिंदखेडराजा तालुका : एकूण ८० ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती महिला - ९, अनुसूचित जमाती - ०, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ११, सर्वसाधारण महिला - २०.
* देऊळगाव राजा तालुका : एकूण ४८ ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला - ६, अनुसूचित जमाती - १, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ६, सर्वसाधारण महिला - १२.
* मलकापूर तालुका : एकूण ४९ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती महिला - ४, अनुसूचित जमाती महिला - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ६, सर्वसाधारण महिला - १२.
* मोताळा तालुका : एकूण ६५ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती महिला - ५, अनुसूचित जमाती महिला - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ९, सर्वसाधारण महिला - १६.
* नांदुरा तालुका : एकूण ६५ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती महिला - ६, अनुसूचित जमाती महिला - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ९, सर्वसाधारण महिला - १६.
* खामगाव तालुका : एकूण ९७ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती महिला - १०, अनुसूचित जमाती - २, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ११, सर्वसाधारण महिला - २५.
* शेगाव तालुका : एकूण ४६ ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला - ५, अनुसूचित जमाती - ०, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - ६, सर्वसाधारण महिला - १२.
* जळगाव जामोद तालुका : एकूण ४७ ग्रामपंचायती असून अनुसूचित जाती महिला - ४, अनुसूचित जमाती - ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ४, सर्वसाधारण महिला - १२.
* संग्रामपूर तालुका: एकूण ५० ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती महिला - ४, अनुसूचित जमाती - ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग - ५, सर्वसाधारण महिला - १२.
या आरक्षणामुळे जिल्ह्यातील महिलांना ग्रामपंचायत स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चिखली तालुक्यातील महिला जातीनिहाय आरक्षण जाहीर
चिखली : तालुक्यातील सरपंचसाठी अनुसूचित जातीसाठी ११ अनुसूचित जमाती २ नागरिकाचा मागासप्रवर्ग १३ तर सर्व साधारण महिला राखीव २४ गावांमध्ये महिला कारभारी होणार आहे. दि.२५ एप्रिल रोजी सदर आरक्षण जाहीर करण्यात आले.यामधे करणखेड,पाटोदा,गुंजाळा,कोनड बु।।,धानोरी,पांढरदेव,येवता,गांगलगाव,हातणी,नायगाव बु।।,कवठळ या गावांमधे सरपंच पद अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहे.तर अनुसूचित जमाती सरपंच पदासाठी टाकरखेड हेलगा,दिवठाणा या गावांमधे राखीव आहे.महिला नागरीकांचा मागासप्रवर्गा करीता शेलोडी,सोनेवाडी,किन्ही सवडत,वैरागड,अमडापुर, आमखेड,मलगी,शेलुद,सवणा,काटोडा, धोत्रा भनगोजी,इसोली,डोंगरगाव,या गावाचा कारभार महिला करणार आहे.सर्वसाधारण महिला करीता अंबाशी,अमोना,आसोला बु।।,आंधई,एकलारा,करवंड,खैरव,डा साळा,डोंगर सेवली,देऊळगाव धनगर पिंपळवाडी,धोडप,पिंपरखेड प्र अमडापुर, पेठ,बेराळा,बोरगाव काकडे,भोगावती,तांबुळवाडी,मंगरू ळ(इ) महिमळ, माळसेंबा,रोहडा,वळती,शेळगाव आटोळ,शेलगाव जहागीर, शेलसुर चिखली तालुक्यातील या गावांचा कारभार महिला पहाणार आहे.
0 Comments