"Request for Water" : चिखलीकरांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा

माजी नगरसेवक दत्ता खरात यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही !




चिखली/(छोटू कांबळे ) :- चिखली शहराला पेनटाकळी धरणावरून पाणी पुरवठा होत असतो, पण तेथील यंत्रणा कूचकामी झालेली असल्याने चिखली शहरवासीयांना १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरूळीत करण्यात यावा अशी मागणी. आज दि. २७ एप्रिल रोजी बुलढाणा आभार दौरा कार्यक्रमात माजी नगरसेवक दत्ता खरात यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाणा येथे आभार कार्यक्रमासाठी आले असताना दत्ता खरात यांनी त्यांची भेट घेऊन चिखलीची पाणी समस्या त्यांच्यासमोर  निवेदनाद्वारे मांडली आपल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, चिखली शहरात पेनटाकळी जलशयातून पाणी पुरवठा होत असलेली यंत्रणा कुचकामी झाल्यामुळे नागरीकांना दहा ते बाराव्या दिवशी पाणी मिळत आहे पेनटाकळी जलाशय येथुन पाणी उपसा करण्यासाठी विहिरीवर 3 (तिन) पंम्प 150 HP चे बसविलेले आहेत परंतु सध्या स्थितीत 1 (एकच) पंम्पद्वारे पाणी उपसा होत आहे वास्तविक पाहता 2 (दोन) पंम्प हे कायम स्वरुपी सुरु ठेवून व 1 (एक) पंम्प स्टॅण्डबाय म्हणून सुस्थीतत असावा परंतु नगरपरिषदेच्या  गलथान कारभारामुळे  मुबलक पाणीसाठी उपलब्ध असून सुध्दा ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दहा ते बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचा प्रकृतीवर दुष्परिणाम होऊ शकतो त्या करीता वरील विषयी सखोल चौकशी होऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संबंधितांना आदेशीत करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments