भूषण गवई बनले भारताचे 52 वे सरन्यायाधीश ; राष्ट्रपती भवनात घेतली शपथ
अमरावती/( द बातमीवाला ) : अमरावतीचे सुपूत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आज 14 मे रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. भूषण गवई हे भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात भारताच्या सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर नवे सरन्यायाधीश कोण असतील याबाबत बरीच उत्सुकता होती. अखेर भूषण गवई यांचं नाव निश्चित करण्यात आलं. त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार असून तो 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. भूषण गवई यांनी त्यांनी जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्यांसाठीही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. यासोबतच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवर बुलढोझर चालविण्याच्या कारवाईवरुन त्यांनी सरकारला फटकारलं होतं.
0 Comments