BJP Buldhana : विजयराज शिंदे यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा !

मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय विजयराज शिंदे भाजप जिल्हाध्यक्षपदी

घाटावरील भाजप जिल्हाध्यक्षपदी विजयराज शिंदे, सचिन देशमुख यांची फेरनियुक्ती



बुलढाणा /(  द बातमीवाला ) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा (घाटावरील) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज दि.१३ मे रोजी दुपारी भाजपाकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. तसेच, भाजपाच्या घाटाखालील जिल्हाध्यक्षपदी सचिन देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.



तिनवेळा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विजयराज शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून पक्षात त्यांची ओळख असून, त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात भाजपच्या संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

पक्षाला नवे बळ

विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनेची नव्याने बांधणी होण्याची अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांशी सतत संवाद साधणारे आणि संघटनेत उत्साह निर्माण करणारे शिंदे यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संधी आणि आव्हाने
जिल्हाध्यक्षपदी झाल्यानंतर विजयराज शिंदे यांच्यासमोर पक्ष संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सक्षम बनवणे, स्थानिक नेत्यांशी समन्वय साधणे, आणि पक्षाची ताकद वाढवणे यावर त्यांचा भर असेल. शिंदे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments