बुलढाणा-चिखली रोडवर बाभळीचे झाड कोसळले ; वाहतूक ठप्प
झाड कोसळल्यामुळे चिखली-बुलढाणा रोडवर मोठा ट्रॅफिक जाम
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली-बुलढाणा रोडवरील मालगणी फाटा नजीक आज दुपारी भले मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने मोठा चक्काजाम निर्माण झाला आहे. या घटनेमुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रीघ लागली आहे.
आज दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या सुसाट वाऱ्याने आणि जोरदार पावसामुळे हे झाड रस्त्यावर कोसळले. झाड कोसळल्याने चिखली-बुलढाणा रस्त्यावरची वाहतूक १ तासापासून पूर्णतः ठप्प झाली आहे. हा रस्ता आधीच अरुंद असून, या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे या घटनेने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. स्थानिक प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली असून, झाड हटवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. तोपर्यंत वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घटनेमुळे वाहनधारकांना रस्त्यातच अडकून पडावे लागले असून, प्रवाशांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलून झाड हटवण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments