चिखली - बुलढाणा रोडवरील वाहतूक खोळंबली; दोन तासांनी सुरळीत झाली
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली-बुलढाणा रोडवरील मालगणी फाटानजीक पडलेले मोठे बाभळीचे झाड अखेर प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीने हटवण्यात आले आहे. आज दुपारी तीन वाजता वादळी वारे आणि पावसामुळे झाड रस्त्यावर कोसळले होते, ज्यामुळे दोन्ही बाजूंनी ३ किलोमिटर अंतरा पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीसांची सर्व टीम आणि संबंधित प्रशासन व युवा सामाजिक कार्यकर्ते विष्णू आव्हाळे , सरपंच सतीश भुतेकर यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी व वाहन चालकांनी तातडीने उपाययोजना करत झाड हटवण्यासाठी यंत्रणा राबवली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झाड बाजूला काढण्यात आले, आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
प्रवाशांचा सुटकेचा श्वास
झाड हटवल्यानंतर रस्त्यावर अडकलेल्या वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला. दोन्ही बाजूनी सुमारे ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती, मात्र आता ती हळूहळू गती पकडत आहे.
0 Comments