NCP (AP) :दत्ता खरात यांनी सोडला शिवसेना शिंदे गट ; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परतले !

 दत्ता खरात यांची पुन्हा राष्ट्रवादीत एंट्री ; शिवसेना सोडून दत्ता खरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल






चिखली /( द बातमीवाला ) :  खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या भव्य संकल्प मेळावा आणि पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष तथा मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे चिखली येथील ओबीसी नेते तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष, मंत्री छगन भुजबयांचे  खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये गेलेले नेते दत्ता खरात यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. दत्ता खरात यांनी लोकसभेच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता, मात्र पक्षाची विचारधारा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास व्यक्त करत आज त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. या वेळी अजितदादा पवार यांनी दत्ता खरात यांचे स्वागत करत, "दत्ता खरात यांच्या पुनर्प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट होईल. त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा पक्षाला नक्कीच लाभ होईल," असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला पालकमंत्री मा. मकरंद आबा पाटील, मा. इंद्रनीलजी नाईक, विधान परिषदेचे आमदार मा. संजयजी खोडके, युवक प्रदेशाध्यक्ष सुरजजी चव्हाण, अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके, आमदार मनोज भाऊ कायंदे, माजी आमदार राणा दिलीपसेठ सानंदा, जिल्हाध्यक्ष मा. अ‍ॅड. नाझेर काझी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments