पळसखेड जयंती येथील 23 वर्षीय तुषार लोखंडे याची आत्महत्या ; गावकऱ्यांमध्ये हळहळ
चिखली /(द बातमीवाला)- चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथील 23 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तुषार सुरेश लोखंडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
दि. 18 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता नाजीम खा हसमखा यांच्या चिखली शिवारातील शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तुषार आढळून आला. या घटनेची माहिती त्याचा काका प्रकाश ज्ञानदेव लोखंडे यांनी पोलिसांना दिली. चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोहेकॉ छाया घुबे यांनी प्रकरणाची नोंद घेतली. तपास अधिकारी पोहेकॉ राजू सुसर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आज दि. 18 जून रोज दुपारी ३ वाजता तुषार याचा अंत्यविधी त्याच्या गावी पळसखेड जयंती येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.
0 Comments