Success Story : चिखलीचा गौरव! ओमकार भाकरे यांची थेट IIT दिल्लीमध्ये वाटचाल !

 चिखलीतील वि.रा. प्रबोधिनी अभ्यासिकेचा विद्यार्थी थेट IIT दिल्लीत दाखल !

परिश्रम + आत्मविश्वास = IIT दिल्ली ! ;  वि.रा. प्रबोधिनीचा अभिमान



चिखली /( छोटू कांबळे ) –  विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी गोष्ट म्हणजे चिखली शहरातील वि.रा. प्रबोधिनी अभ्यासिका या संस्थेतील विद्यार्थी ओमकार विजय भाकरे यांनी नुकत्याच झालेल्या GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवत IIT दिल्ली सारख्या प्रतिष्ठित संस्थेत जल संसाधन (Water Resources Engineering) या क्षेत्रात मास्टर डिग्री करण्याची संधी मिळवली आहे.

      ओमकार भाकरे हे चिखली येथील स्थानिक रहिवासी असून त्यांनी आपले B.E. सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर कोणतीही खासगी क्लासेस न लावता, केवळ वि.रा. प्रबोधिनी अभ्यासिका येथे सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश संपादन केले. त्यांच्या या अभूतपूर्व यशाचा गौरव करण्यासाठी प्रबोधिनीच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी एच.डी.आर. उद्योग समूहाचे प्रमुख श्री. गोविंद देव्हडे आणि अभ्यासिकेचे संचालक रणजित देव्हडे यांनी ओमकारच्या यशाचे कौतुक करत सांगितले की, "मोठ्या शहरात जाऊन क्लासेस लावल्याशिवाय आयआयटीसारख्या संस्थेत प्रवेश मिळवणं शक्य आहे, हे ओमकारने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशाने चिखलीसारख्या लहान शहरातील विद्यार्थ्यांनाही नवीन दिशा मिळेल." सत्कार समारंभात स्वीकार देव्हडे, वैभव राऊत (IIT जोधपूर), संग्राम पाटील, निखिल शिंदे, शंतनू गवळी, गणेश सोनुने, मो. अर्श, विजय शेळके, संतोष तेजनकर, कनिष बनसोडे, विनोद परिहार, भावेश पटेल यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. सर्वांनी ओमकारला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  ओमकारचे हे यश फक्त वैयक्तिक नाही, तर ग्रामीण भागातील व शहरातील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एक प्रकाशवाट ठरू शकते. स्व-अध्ययन, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतीही शिखरं गाठता येतात, याचा हा उत्तम नमुना आहे.

🔹वि.रा. प्रबोधिनी अभ्यासिका –  गुणवत्तेचं व्यासपीठ !

चिखलीतील वि.रा. प्रबोधिनी अभ्यासिका ही शिकवणीविना अभ्यासासाठी प्रेरणादायी जागा ठरली आहे. स्व-अध्ययनावर भर, शिस्तबद्ध वातावरण आणि मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं आहे. ओमकार भाकरे यांची IIT दिल्लीमधील निवड ही संस्थेच्या कार्याची चमकदार झलक आहे.


Post a Comment

0 Comments