BJP vs ShivSena : महायुतीत खळबळ; चिखली भाजपचे उपशहराध्यक्ष शिवसेनेत !

चिखलीत भाजपला धक्का ; भाजपा उपशहराध्यक्ष सादिकभाई काझींसह अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश



चिखली/(छोटू कांबळे/द बातमीवाला) – केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वाखाली, चिखली भाजपचे शहर उपाध्यक्ष सादिकभाई काझी, उ.बा.ठा गटाचे इमरान शेख आणि सादिक शेख यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमात पक्षात काही नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये भाजप नेते दत्ता सुसर यांचे मोठे बंधू अमर सुसर यांची शिवसेना उपशहर प्रमुख, इमरान शेख यांची शिवसेना उपशहर प्रमुख तथा कामगार जिल्हा उपाध्यक्ष, सादिक शेख यांची शिवसेना उपशहर प्रमुख, अमर काळे यांची शिवसेना उपशहर प्रमुख आणि राहुल शेळकर यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. महायुतीत असतानाही भाजपचे उपशहराध्यक्ष असलेले सादिकभाई काझी यांनी आज शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला. या प्रवेशामुळे चिखलीतील शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे.



Post a Comment

0 Comments