चिखलीत काँग्रेस नेते सचिन शिंगणे यांचा भाजपात प्रवेश
चिखली (छोटू कांबळे/द बातमीवाला) – काँग्रेस चिखली कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन शिंगणे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात हा प्रवेश सोहळा पार पडला. हा कार्यक्रम चिखली येथील देवा भाऊ लाडकी बहीण पतसंस्था उद्घाटन प्रसंगी श्रीराम नागरी पतसंस्थे येथे पक्ष प्रवेश झाला. या वेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन शिंगणे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक पातळीवर बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
0 Comments