Politics Breaking" : चिखलीच्या राजकारणात हलचल ; आ. संजय गायकवाड यांची जनसंवाद बैठक ठरणार निर्णायक ?

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गट सज्ज ; चिखलीत संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद बैठक

चिखलीत राजकीय भूकंपाची चाहूल ; शिवसेना शिंदे गटाची बैठक ठरणार टर्निंग पॉईंट





चिखली/(छोटू कांबळे) - बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (शिंदे गट) फायर ब्रँड नेते संजय गायकवाड यांची राजकीय नजर आता चिखली विधानसभा मतदारसंघावर पडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, रविवार १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिखली येथील परमहंस मौनी बाबा महाराज मठ येथे एक भव्य जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत चिखली शहर व तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उद्देश असून, या कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर आमदार श्री. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल संजय गायकवाड याचाही बॅनरवर फोटो उल्लेख असल्याने, त्याच्या राजकारणातील सक्रियतेकडेही संकेत मिळत आहेत.            

   स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या बैठकीतूनच शिवसेना (शिंदे गट) आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अधिकृतपणे घोषित होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर "संवाद आपुलकीचा , आपल्या माणसांशी" असे ठळकपणे लिहिले असून, हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे चिखलीतील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शहरभरात लागलेले हेच ते बॅनर जे चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment

0 Comments