Congress Entry : वंचितचे प्रा.मिलिंदकुमार मघाडे काँग्रेसमध्ये ; जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले “ही प्रगतीची दिशा”

वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रवक्ते प्रा. मिलिंदकुमार मघाडे काँग्रेसमध्ये दाखल !



चिखली /( छोटू कांबळे )- वंचित बहुजन आघाडीचे नामांकित तालुका प्रवक्ते प्रा. मिलिंदकुमार मघाडे यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रवेश सोहळ्यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका व जिल्हा स्तरावरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद मघाडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सामाजिक न्याय, बंधुता आणि लोकशाही मूल्ये यांसाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी मी एकरूप झालो आहे. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे.”
या प्रवेशामुळे तालुका आणि जिल्हा पातळीवरील काँग्रेस पक्षाचे बळ अधिकच मजबूत होईल, असा विश्वास शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सवडतकर यांनी व्यक्त केला आहे.
  यावेळी चिखली शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहर काझी, डॉ. मोहमद इसरार, प्रा. राजू गवई सर ,कुणाल बोंद्रे , प्राचार्य निलेश गावंडे सर,शहजात अली खान ,राजू रज्जाक ,डॉक्टर अमोल लहाने, ऍड. विलास नन्हई, जका भाई,खलिल बागवान ,भिकाजी शेटे ,सचिन शेटे,जय बोंद्रे , डॉ.अमोल लहाने ,विलास ननंई,शोएब मुसा,गोकुळ शिंगणे,आरीफ बागवान, शकील भाई यांची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे मत

“मिलिंद कुमार मघाडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हे सामाजिक सलोखा आणि प्रगतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे पक्षाला तालुका स्तरावर नवसंजीवनी मिळेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून कार्यरत राहणाऱ्या तरुण नेत्यांचा पक्षात प्रवेश हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे
.”

Post a Comment

0 Comments