चिखली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे शहराध्यक्ष विलास घोलप नगराध्यक्षपदासाठी इच्छुक !
चिखली (छोटू कांबळे) — चिखली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची तयारी प्रशासन पातळीवर वेगाने सुरू असून, सध्या वार्ड फॉर्मेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे मित्रपक्ष असलेले शिवसेना (शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले विलास घोलप यांचे नाव ठामपणे पुढे येत आहे.
विलास दादा घोलप यांचा जनसंपर्क, सामाजिक कार्यातील सातत्य आणि संघटन कौशल्य पाहता, ते चिखलीतील शिवसेनेच्या मजबूत नेतृत्वाचा चेहरा ठरले आहेत. हिंदुरुदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत ते “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हे सूत्र आजही प्रामाणिकपणे पाळत आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा. प्रतापराव जाधव यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असलेले विलास घोलप यांनी शाखाप्रमुखापासून ते चिखली शहरप्रमुख पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, निवेदन देणे तसेच प्रशासनाला धारेवर धरणे हे त्यांचे कार्य सतत सुरू आहे. त्यांची खास ओळख म्हणजे – सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढणारा, आणि हिंदुत्वासाठी कट्टर भूमिका घेणारा नेता. चिखली शहरात त्यांच्याकडे शिवसेनेची भक्कम कार्यकर्त्यांची फळी आहे, जी त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून काम करत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शहरातील वातावरण तापू लागले असून, विविध पक्षांत संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. मात्र, शिवसेनेतून नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले आणि सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळवणारे उमेदवार म्हणजे विलास घोलप हे आहेत. विकासाचे ध्येय, समाजाशी असलेली नाळ, शिवसेनेची निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास — या सर्वांचे प्रतीक ठरणारे नेतृत्व म्हणजे विलास दादा घोलप ! चिखली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर शिवसेना कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचीही नजर लागलेली आहे.
या पार्श्वभूमीवर विलास घोलप यांनी "द बातमीवाला" माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की...
"मी शिवसेनेच्या विचारधारेशी बांधील आहे. हिंदुरुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घालून दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मार्गावरच मी आजतागायत कार्य करत आहे. नगराध्यक्षपद ही केवळ सत्ता मिळवण्याची संधी नाही, तर ती जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आहे."माझ्या सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या नात्यावर, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी घेतलेल्या संघर्षावर, आणि कार्यकर्त्यांच्या बळावर मला पूर्ण विश्वास आहे. जर पक्षाने संधी दिली, तर मी संपूर्ण प्रामाणिकपणे चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीन. चिखली नगरपालिकेला सक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्याची माझी तयारी पूर्ण आहे. "नगरपालिका ही लोकांशी थेट जोडलेली संस्था आहे. येथे काम करताना जनता हीच माझी ताकद असेल. मी कुणाच्याही विरोधात नाही, पण लोकहितासाठी नेहमी ठाम आहे आणि राहीन.”
0 Comments