चिखलीत जुगारावर रेड – 1,15,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त !
काँग्रेसचे माजी नगरसेवक रफिकसेठ कुरेशी जुगार अड्ड्यावरून घेतले ताब्यात
चिखली (द बातमीवाला ) – चिखलीतील जाफराबाद रोडवरील तुषार बोंद्रे यांच्या जिमच्या वरच्या मजल्यावर मंगळवार, 25 नोव्हेंबर 2024 रोजी एक मोठा जुगार अड्डा चालवण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 15 आरोपींविरोधात जुगार संबंधित गुन्हा दाखल केला. हि घटना संध्याकाळी 7.00 ते 7.30 वाजेच्या दरम्यान घडली. पोलिसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 38,300 रुपये नगदी तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. एकूण मिळालेल्या मुद्देमालाची किंमत 1,15,050 रुपये आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुसार, आरोपींनी जुगार खेळण्यासाठी एका बंद ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार चालवला होता. पोलिसांनी छापामारी करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1. नगदी रक्कम – 38,300 रुपये
2. जुगाराचे साहित्य – 3200 रुपये
3. 52 तास पत्ती – किंमत 50 रुपये
4. मोबाईल फोन – एकूण किंमत 73,500 रुपये
सर्व आरोपी चिखली शहर व तालुक्यातील परिसरातील विविध भागातील रहिवासी आहेत. त्यात, काँग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल रफिक अब्दुल कबीर (58), जितेंद्र नामदेव राऊत (36), शंकर गुलाबराव तायडे (54), एकनाथ पुंडलिक सुरडकर (64), राजेंद्र गुलाबराव जैन (58), शिवाजी सखाराम सुरडकर (41), सुधीर सुदाम गवई (46), परमेश्वर हिम्मतराव गवारी (35), संतोष अनिल जाधव (34), आजम खान मौजम खान (48), जितेंद्र जगदीश रूपारेलिया (42), कुणाल धीरजराल रूपारेलिया (38), मनोज नरसिंगदास रूपारेलिया (47), शेख जमील शेखलील (42), आणि व अन्य जुगारीचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, आरोपींविरुद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
0 Comments