"शिवराज दादा, तुमचं नेतृत्व आमच्या उमेदीचं बलस्थान आहे ! "
नागरिक व तरुणांच्या चेहऱ्यावर झळकल्या जनभावना
चिखली /( छोटू कांबळे) :-चिखली शहर आणि तालुक्यातील गावागावांत युवा नेते शिवराज दादा पाटील यांच्या वाढदिवसाचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. काय ती फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर, भव्य मिरवणूक, आकर्षक बॅनर आणि सोशल मीडियावर उत्साहाचे वारे यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला होता. युवा हृदयसम्राट, अभ्यासू आणि कणखर नेतृत्व म्हणून परिचित असलेले भाजप युवा नेते तथा आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांचे बंधू शिवराज दादा पाटील हे तरुणाईचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पेपर जाहिरातींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला, तर सोशल मीडियावर त्यांच्या नेतृत्वाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव झाला.शहराच्या मुख्य ठिकठिकाणी चौकात ढोल-ताशांच्या गजराने वातावरण रोमांचित झाले. विविध ठिकाणी बॅनर्स आणि पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचे प्रदर्शन करण्यात आले. शिवराज दादा यांचे कार्य युवकांना नवी दिशा देणारे आहे, असे सांगत अनेकांनी त्यांच्याबद्दल कौतुक व्यक्त केले. शिवराज दादा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वयोगटातील लोकांशी आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची कला. प्रत्येक व्यक्तीला हसत-हसत सामोरे जाणारे आणि प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले.शिवराज दादा यांचे कार्य नेहमीच युवकांना नवी दिशा देणारे आहे. त्यांनी अनेक तरुणांना त्यांच्या उद्दिष्टांसाठी प्रेरित केले आहे. त्यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनामुळे अनेक युवकांनी प्रगतीचा मार्ग धरला आहे. शिवराज दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या जल्लोषाने चिखली आणि आसपासच्या परिसराला नवा ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. अशाच प्रेरणादायी कार्याची अपेक्षा करत, त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
चिखलीचे नवे तेजस्वी पर्व शिवराज पाटील !
चिखली शहरातील प्रमुख चौका चौकात भव्य वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा प्रेक्षणीय ठरला. फटाक्यांच्या आवाजाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले. विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या आकर्षक बॅनर्सनी आणि पोस्टर्सनी त्यांच्या लोकप्रियतेचे दर्शन घडवले. "शिवराज दादा, तुमचं नेतृत्व आमच्या उमेदीचं बलस्थान आहे!" अशा भावना उपस्थित नागरिक आणि तरुणाईच्या चेहऱ्यावर झळकत होत्या. लोकांच्या मनात आपल्या कणखर, अभ्यासू आणि आपुलकीच्या स्वभावामुळे विशेष स्थान निर्माण करणाऱ्या शिवराज दादा पाटील यांचा वाढदिवस हा केवळ एका नेत्याचा सन्मान नव्हता, तर तो त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची आणि जनतेच्या प्रेमाची साक्ष होती.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस....
फक्त चिखली आणि तालुक्यापुरते मर्यादित न राहता, सोशल मीडियावर देखील शिवराज दादा पाटील यांच्या कार्याचा आणि लोकप्रियतेचा डंका वाजला. शुभेच्छांचा पाऊस पाडत जनतेने त्यांच्या समाजकार्याची सरशी साजरी केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ, छायाचित्रे, पेपर जाहिराती आणि पोस्ट्सनी डिजिटल जगात उत्सवाचा जल्लोष निर्माण केला.चिखलीतील लोकप्रिय दैनिक ‘दैनिक आम्ही चिखलीकर’ तर्फे भाजपा युवा नेते शिवराज दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष ‘दादासाहेब रंगीबेरंगी’ अंक प्रकाशित करण्यात आला.या विशेषांकात दादांच्या नेतृत्वगुणांचा, सामाजिक कार्याचा व त्यांच्या युवामध्ये असलेल्या लोकप्रियतेचा आढावा घेण्यात आला आहे. विविध मान्यवरांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना, कार्यप्रेरणा आणि शुभेच्छा संदेश या अंकात समाविष्ट आहेत.
0 Comments