अवैध रेती उपसा विशेष मोहिम ; मौजे इसरुल येथे चार बोटी नष्ट
बुलडाणा /( द बातमीवाला ) : अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बुलढाणा उपविभागीय कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन पथकाव्दारे खडकपूर्णा धरणातील अवैध उपसा करणाऱ्या मौजे इसरुल येथे दि. 25 मार्च रोजी मोठी कारवाई करत चार बोटी नष्ट केल्या, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
सदर कारवाई जिल्हधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी तहसिलदार संतोष काकडे, संभाजी पवार, श्रीकृष्ण जाधव, मंडळ अधिकारी भगवानराव पवार, ग्राम महसूल अधिकारी योगेश भुसारी, ना.पो.का विलास पवार, सुनील डव्हळे, अनिल बोंद्रे, विनोद गिरी, नितीन काळे, महसूल सेवक प्रभाकर इंगळे, वाहन चालक संतोष भोपळे, तसेच पोलीस विभागाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते. तसेच ब्लास्टिंगसाठी सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार देऊळगाव राजाचे वैशाली डोंगरजाळ यांचे सहकार्य लाभले.
0 Comments