बालाजी अर्बनची ग्राहकांच्या सेवेत मोबाईल बँकिंग व क्युआर कोड सुविधा सुरु
चिखली/(छोटू कांबळे):- बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह कडुन कार्पोरेटकडे हे ब्रिद घेऊन आधुनिक युगात तांत्रिक सुविधेसह आपल्या सभासद ग्राहकांना कमर्शियल बँकामध्ये व इतर सर्व बँकामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवहार करण्याच्या सुविधा बालाजी अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटी चिखली र.नं. 413 या संस्थेने प्रगतीचे एक पाउल पुढे या दृष्टीकोनातुन आपल्या ग्राहक सभासदांना मोबाईल बँकीग अॅप व क्यु आर कोड सुविधेचा शुभारंभ आज दिनांक 4 जुलै 2025 रोज शुक्रवारला संंस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड्.श्री मंगेश हरीभाउ व्यवहारे, उपाध्यक्ष श्री सत्यनारायण लढढा, ज्येष्ठ संचालक श्री सुदर्शन अंबादास भालेराव, नारायणसेठ भवर, प्रताप खरात, तांत्रिक सल्लागार शार्दुलजी व्यवहारे, सरव्यवस्थापक श्री अनिलजी गाडे, सहा सरव्यवस्थापक श्री अशोक नाईक, ज्येष्ठ कर्मचारी श्री रमेशजी देषमुख, नेटविन सॉप्टवेअर इंजिनिअर श्री सुमीत बेलवलकर आणि सर्व कर्मचारी यांचे हस्ते संस्थेचे सभासद श्री विद्यानंद कुटे, श्री उमेश परिहार, श्री प्रसाद जाधव यांना मोबाईल बँकीग अॅप व क्युआर कोड वितरीत करण्यात आले. भविष्यात या स्पर्धेच्या युगात काळानुरूप व्यवहार करण्याच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्या बँकीग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष अॅड्. श्री मंगेश हरिभाउ व्यवहारे यांनी संस्थेच्या सभासदांना उददेशुन दिले. सदर कार्यक्रमास अनेक सभासंदासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बालाजी अर्बनच्या सभासदांनी या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घ्यावा.
0 Comments