शिवसेना नेते कपिल खेडेकर यांचे पत्नी सौ. वैशाली खेडेकर यांना औक्षणातून शुभेच्छा !

 चिखलीत शिवसेना नेते कपिल खेडेकर यांच्याकडून पत्नीच्या वाढदिवसानिमित्त औक्षण करून अनोखी शुभेच्छा !



चिखली /( द बातमीवाला ) : शिवसेना नेते कपिल खेडेकर यांनी आपल्या पत्नी सौ. वैशाली खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. घरगुती व आत्मीय वातावरणात त्यांनी औक्षण करून आपल्या अर्धांगिनीचा जन्मदिन साजरा केला.

शिवसेना नेते म्हणून राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कपिल खेडेकर यांनी कौटुंबिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. वाढदिवसाच्या या साध्या पण हृद्य सोहळ्यात कुटुंबीय व मित्रपरिवाराने सहभाग घेतला.

सौ. वैशाली खेडेकर यांना यावेळी विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. खेडेकर दाम्पत्याचे सामाजिक आणि कुटुंबीयांतील हे अनुकरणीय उदाहरण नागरिकांत चर्चेचा विषय ठरले आहे.

"कुटुंब हेच आपले खरे बळ," असे सांगत कपिल खेडेकर यांनी या निमित्ताने कौटुंबिक मूल्यांवर भर दिला.

Post a Comment

0 Comments