माळी समाजासाठी समर्पित नेतृत्व ; मोहन मेहेत्रे यांची निवड स्वागतार्ह
समाजात जागृतीचे काम, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपण करत आहात आपल्या हातून महात्मा फुलेंच्या सत्यशोधक मार्गाचे मोठ्या प्रमाणावर कार्य व्हावे तसेच माळी समाजाचे संघटन गावागावात व जिल्ह्यात मजबूत व्हावे यासाठी आपली निवड करण्यात आली असल्याचे अखिल भारतीय माळी महासंघाच्या राज्य कार्यकारणी सदस्य तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय खरात यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश हिरळकार, प्रदेश अध्यक्ष अभय तायडे, प्रदेशाध्यक्ष राजेश मेहेत्रे, प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात सदर नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती वेळी त्याठिकाणी समाजातील प्रतिष्ठीत नागरीक राजाभाऊ खरात, श्रीराम झोरे, दत्ता खरात, प्रकाश सपकाळ, विलास घोलप, राका मेहेत्रे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
0 Comments