BJP vs Congress : काँग्रेसला मोठा धक्का ; चिखलीत माजी नगरसेवक दीपक खरात यांचा आज होणार भाजप प्रवेश !

चिखलीत आज भव्य पक्षप्रवेश सोहळा ; आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात आयोजन



चिखली /( छोटू कांबळे ) - चिखली विधानसभा मतदारसंघात आज 26 जून 2025 रोजी होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व चिखलीच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील करणार आहेत.

या सोहळ्यात काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार तथा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले दीपकभाऊ खरात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. हा सोहळा आज सायंकाळी 6 वाजता संत सावता माळी भवन, चिंच परिसर, जुनेगाव, चिखली येथे होणार आहे.                                        दीपक खरात यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. विशेषतः नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन भाजप चिखली शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी केले आहे. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या पक्षप्रवेशाने भाजपच्या संघटनेला अधिक बळकटी मिळणार असून स्थानिक राजकारणात भाजपची पकड वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महत्त्वपूर्ण घटनेमुळे चिखलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Post a Comment

0 Comments