राहुल सवडतकर यांची दमदार एंट्री ; पक्षसंघटनेला बळकट करण्याचा निर्धार
राहुल सवडतकर यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी
चिखली/(छोटू कांबळे ): काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राहुल सवडतकर यांची चिखली शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी आमदार आणि काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नियुक्तीपत्र देताना काँग्रेस नेते हाजी दादू सेठ, डॉ .निलेश गावंडे व डॉ. राजु गवई उपस्थित होते.
राहुल नंदकिशोर सवडतकर हे एक प्रभावी आणि युवा नेतृत्व असून, युवकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची निवड पक्षाला नवीन ऊर्जा देणारी ठरेल, असे सर्व स्तरातून बोलले जात आहे. राहुल सवडतकर यांची निवड आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासाठी दमदार ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट होईल आणि नव्या उंचीवर जाईल, असा आशावाद कार्यकर्त्यांमध्ये आहे. नियुक्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात माजी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर आणि माजी शहराध्यक्ष अतहर काझी यांच्या कार्यकाळातील योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार व्यक्त करत पक्षाच्या भवितव्यासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली. राहुल सवडतकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळेल आणि संघटनेला बळकटी प्राप्त होईल, असे पक्षाचे वरिष्ठ आणि कार्यकर्ते यांनी म्हटले आहे.
0 Comments