Congratulation : धाडसी कारवाईला सलाम: चिखलीचे सुपुत्र राहुल देव्हडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव !

 पोलीस दलाच्या शौर्याला सलाम, राहुल देव्हडे यांचा अभिमानास्पद गौरव..

गडचिरोली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देव्हडे यांचे साहसाचे सोनेरी पान ; मुख्यमंत्र्यांकडून प्रशस्तिपत्र




गडचिरोली /( द बातमीवाला ) : माओवादी चळवळीला मोठा धक्का देणाऱ्या विशेष अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे चिखलीचे सुपुत्र तथा गडचिरोली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल देव्हडे यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

दिनांक २० मे २०२५ रोजी मौजा-बिनागुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाने राबविलेल्या धाडसी मोहिमेत ५ जहाल माओवादी सदस्यांना अटक करण्यात आली होती. या मोहिमेत राहुल देव्हडे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नेतृत्व करत माओवाद्यांना अटक केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि माओवादी साहित्य देखील जप्त करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की, "राहुल देव्हडे यांचे साहस आणि कर्तव्यनिष्ठा पोलीस दलाच्या उंचावलेल्या प्रतिमेचे प्रतीक आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने जिल्ह्यातील सुरक्षिततेला बळकटी मिळाली असून, त्यांनी पोलीस दलासाठी आदर्श निर्माण केला आहे.   



                                                                                     " या सन्मानानंतर राहुल देव्हडे यांना सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. गडचिरोली पोलीस दलाची ही कामगिरी जिल्ह्यात आदर्श ठरली आहे.

Post a Comment

0 Comments