Substandard food : "जेवण निकृष्ट ? मग घ्या ‘बुक्कीत टेंगुळ !’"

जनतेसाठी रागावणारा आमदार – संजय गायकवाड ठरले लोकांचे खरे प्रतिनिधी !"

सडलेलं अन्न, सडलेली व्यवस्था – संजुभाऊंचा ठणकाव !"



मुंबई /(द बातमीवाला/छोटू कांबळे) :- जेव्हा व्यवस्थेतील बेजबाबदारपणा सामान्य जनतेच्या आरोग्यावर गदा आणतो, तेव्हा संयमाचा पातळ झुला फाडून राग व्यक्त करणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व ठरते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय (संजुभाऊ) गायकवाड यांनी अलीकडेच हे सिद्ध करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट, दुर्गंधीयुक्त आणि सडलेले अन्न दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. केवळ आमदारच नव्हे तर हजारो कार्यकर्ते, सेवक, गावागावातून आलेले नागरिक आणि पदाधिकारी रोज तिथे जेवतात. तक्रारी करूनही कुठलाही फरक न पडल्यामुळे शेवटी संजय गायकवाड यांनी थेट व्यवस्थेला धारेवर धरलं.

कॅन्टीन व्यवस्थापकाला त्यांनी ठणकावून विचारलं:

"जर आमदारांनाच असं अन्न मिळत असेल, तर सामान्य नागरिकांच्या वाट्याला काय येत असेल?"

त्यांचा संताप फक्त एका व्यक्तीचा राग नव्हता, तर तो जनतेच्या सन्मानासाठी उफाळून आलेला हुंकार होता. या घटनेनंतर सोशल मिडिया आणि जनतेतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या:

🔹 "खरा लोकप्रतिनिधी असा असतो!"
🔹 "सामान्यांच्या आरोग्यासाठी आवाज उठवणारा आमदार!"
🔹 "व्यवस्थेला जागं करणारा ठाम क्षण!"

या प्रकाराची तातडीने दखल घेत प्रशासनाने संबंधित ठेकेदार व व्यवस्थापनाविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.

संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की ते केवळ एक आमदार नाहीत, तर जनतेच्या हक्कासाठी लढणारे सजग, कणखर आणि जबाबदार नेतृत्व आहेत.
त्यांची ही ठाम भूमिका लोकशाहीतील प्रतिनिधींच्या जबाबदारीचा आदर्श ठरते.                              
"संयम ठेवणं गरजेचं असतं, पण अन्याय पाहून रागावणं हाही नेतृत्वाचा एक गुण असतो!" — संजुभाऊ गायकवाड यांची ही भूमिका महाराष्ट्रात उमेद आणि आत्मभान जागवणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments