हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांना पाठींबा – विजय पवार
चिखली (द बातमीवाला ) :- चिखली विधानसभा मतदार संघामध्ये हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपा उमेदवार श्वेताताई महाले यांना जाहिर पाठींबा देत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी आज पत्रकार परीषदेमध्ये केले.
दि. १५ नोव्हेंबर रोजी स्थानिक मिरा सेलेब्रशन या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विजय पवार यांनी महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले यांना आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला. पुढे बोलतांना ते म्हणाले की , हिंदुत्वाची विचारधारा घेऊन हिंदु राष्ट्रसेना या संघटनेमध्ये काम करीत असतांना हिंदुत्वाचा हाच विचार पुढे नेण्यासाठी चिखली विधानसभा मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. व प्रचारदेखील सुरु करण्यात आला होता. मात्र भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान आपल्या उमेदवारी अर्जामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ शकते ही बाब लक्षात आल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असून यापुढील दिवसांमध्ये आ.श्वेताताई महाले यांच्या प्रचारकार्यासाठी झोकुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments