चिखलीत राजकीय उलथापालथ !

काँग्रेसला धक्का... चिखली युवक काँग्रेस अध्यक्षाचा राजीनामा ; किशोर सोळंकी चार सरपंचांसह भाजपमध्ये जाणार ? 





चिखली /( छोटू कांबळे ): विधानसभा युवक काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष किशोर विठ्ठल सोळंकी यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा व काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोळंकी यांनी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्याकडे काल दि. २१ जानेवारी रोजी आपला राजीनामा सादर केला आहे.

राजीनामा पत्रात सोळंकी यांनी पक्षाला आवश्यक वेळ देणे शक्य नसल्याचे कारण नमूद केले आहे. तथापि, या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही सूत्रांच्या माहितीनुसार, किशोर सोळंकी हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, चार ते पाच सरपंचांसह ते आज मुंबईत भाजप नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे चिखली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या या हालचालीमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोळंकी यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. परंतु, या घडामोडींमुळे चिखलीतील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Post a Comment

0 Comments