चिखलीत विहिरीत सापडला 65 वर्षीय महिलेचा मृतदेह ; शहरात खळबळ !

 चिखलीत विहिरीत आढळला 65 वर्षीय महिलेचा मृतदेह ; दोन दिवसांपासून होती बेपत्ता





चिखली ( छोटू कांबळे) : चिखली शहरातील स. द. म्हस्के रोडवरील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सायंकाळी उघडकीस आली. मृत महिलेची ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५ वर्षे, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे.

दुर्गाबाई राजपूत या मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी ४ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. आज दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता स. द. म्हस्के रोडवरील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी तातडीने धाव घेत पंचनामा सुरू केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुर्गाबाई  यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप  समजू शकले नाही . मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

(मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांची झालेली गर्दी)



Post a Comment

0 Comments