कपिल खेडेकर यांचा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा !
चिखली/(द बातमीवाला ): शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्यक्तिगत कारणांमुळे ते पक्षाला अधिक वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी आज दि. ३१ डिसेंबर रोजी एका पत्राद्वारे स्पष्ट केले. कपिल खेडेकर यांनी त्यांच्या राजीनाम्याची विनंती श्री नरेंद्रजी खेडेकर, संपर्कप्रमुख, शिवसेना यांच्याकडे केली आहे. या राजीनाम्यामुळे चिखली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता आहे.
0 Comments