"शहरात डासांचा उच्छाद; आरोग्य धोका वाढला"

चिखली शहरात डासांचा उपद्रव वाढला ; जंतुनाशक फवारणी फक्त कागदोपत्री ?



चिखली /( छोटू कांबळे ): चिखली शहरात व प्रभाग क्रमांक ५ मध्ये उघड्या नाल्यांमुळे आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

नियमित औषध फवारणी न झाल्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. शहरातील विविध भागात व प्रभाग क्रमांक ५ मध्ये उघड्या नाल्या व साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वेगाने वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार औषध फवारणीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. गंभीर बाब म्हणजे, जंतुनाशक फवारणी केवळ कागदोपत्री असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडून फवारणी केल्याचा दावा करण्यात येतो; परंतु प्रत्यक्षात कोणतीही फवारणी होत नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, आरोग्य विभागाने जागरूकता मोहिमा राबवून स्वच्छतेसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments