MLA SHWETATAI : "शब्द नाही, काम बोलतंय!"

 "गर्वाने म्हणा, आमचं नेतृत्त्व विकास रणरागिणी श्वेताताई!"

"गेल्या ६० वर्षात न झालेलं, अडीच वर्षात शक्य केलं!"






स्वप्नपूर्तीसाठी नव्या दमाने, नव्या जोमाने उभे राहूया!

राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे माध्यम नसून, ते समाजसेवेचे साधन आहे. आणि या तत्त्वाला कृतीत उतरवणाऱ्या नेतृत्वाचं नाव म्हणजे रणरागिणी सौ. श्वेताताई महाले. अवघ्या अडीच वर्षांत संपूर्ण मतदारसंघाच्या विकासाचा चेहरा-मोहराच बदलून टाकणाऱ्या या धडाडीच्या नेतृत्वाने "विकास म्हणजे काय?" हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.

गेल्या ६० वर्षांत जे होऊ शकलं नाही, ते श्वेताताईंनी काही महिन्यांत करून दाखवलं. समाजाच्या प्रत्येक थरातील घटकांपर्यंत विकास पोहचवण्याचं कार्य पार पाडलं. कोणताही समाज वगळला गेला नाही; प्रत्येकासाठी काही ना काही केलं. हीच त्यांची खरी ओळख आहे – पक्ष, जात, धर्म, समाज यांच्या पलीकडे जाऊन काम करणारी नेता.

चिखली शहरात कोट्यवधींची विकासकामे झाली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंत, सभागृहांपासून ते शेत रस्त्यांपर्यंत, प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांच्या वीज समस्यांवर मात करत, आरोग्य सेवा आणि दळणवळणाच्या सुविधा पुरवणं ही त्यांच्या कार्यशैलीचा अविभाज्य भाग राहिला.

मायबाप जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहणाऱ्या ताईंनी आणि भाऊजींनी जनतेची कामं आपली जबाबदारी समजून केली. मुंबईपर्यंत चकरा मारूनही न सुटणारी कामं, ताईंनी तात्काळ मार्गी लावली. हे करताना त्यांनी कधीही कोणाची जात, धर्म विचारला नाही. त्यांच्यासाठी एकच ओळख महत्त्वाची होती – "हा माझ्या मतदारसंघाचा आहे."

दुर्दैवाने, निवडणुकीत काही समाजघटकांनी विरोध केला, पायाला गंभीर दुखापत असूनही ताईंनी घराघरात जाऊन संवाद साधला. विकासासाठी झगडणं हा गुन्हा आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील नागरिकाने स्वतःला विचारावा.

महाले साहेबांसारखा अनुभवी अधिकारी, आणि त्यांच्यासोबत रणरागिणी श्वेताताई यांचं प्रामाणिक नेतृत्व – या दोघांनी एकत्र येऊन मतदारसंघासाठी जे स्वप्न पाहिलं, ते पूर्ण होणं अत्यावश्यक आहे. आज काही मोठे नेते त्यांच्या झळाळत्या पदांसाठी अस्वस्थ आहेत, पण सामान्य जनतेसाठी ही जोडी म्हणजे आशेचा किरण आहे.

आता वेळ आली आहे नव्या दमाने, नव्या जोमाने पुढे जाण्याची. विरोध, कटकारस्थानं, राजकारण – हे सगळं बाजूला ठेवून एकत्र येऊया. फक्त एक विचार मनात ठेवूया – "जो आपला विकास करेल, तोच आपला नेता!"

आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकायच्या आहेत. कुणावर अवलंबून न राहता, आपल्याला स्वतःची तयारी मजबूत ठेवायची आहे. कारण ताई आणि भाऊजींच्या हातून हाच मतदारसंघ स्वप्नवत होणार आहे.

मायबाप जनतेचा कायापालट हेच श्वेताताईंचं ध्येय आहे, आणि हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय त्यांची धाव थांबणार नाही.



चला, एकत्र उभे राहूया ! रणरागिणीच्या पाठीशी कणाकणाने उभं राहूया !
स्वप्नपूर्तीसाठी पुन्हा नव्या दमाने, नव्या जोमाने तयार होऊया !!


आपला 
सुरेश इंगळे पाटील 
स्विय सहाय्यक 
आ सौ श्वेताताई महाले पाटील



Post a Comment

0 Comments