केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या जिल्ह्यात!

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

"सामाजिक न्यायाच्या योजनांचा घेणार आढावा"




बुलढाणा, (छोटू कांबळे)  : केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे उद्या , दि. 8 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे. मंगळवार दि. 8 रोजी दुपारी 2.30 वाजता जळगाव येथून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या योजनेबाबत बैठक. त्यानंतर लगेच सायंकाळी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6.15 वाजता नागरिकासोबत संवाद(मेळावा). स्थळ: लायब्ररी ग्रॉऊंड, मलकापूर जि. बुलढाणा. रात्री 8.55 वाजता मलकापूर रेल्वे स्टेशन येथून पूणेकडे रवाना होतील.


Post a Comment

0 Comments