"Minister of State Public Relations Officer" : निरज काकडे केंद्रीय आयुष राज्यमंत्र्यांचे प्रशासकीय PRO म्हणून नियुक्त

निरज काकडे यांची केंद्रीय आयुष राज्यमंत्र्यांच्या प्रशासकीय PRO पदी नियुक्ती

चिखली तहसीलच्या नायब नाजर पदावरून मंत्रालयीन जबाबदारीपर्यंतची झेप



चिखली/( छोटू कांबळे ) : चिखली तहसील कार्यालयात नायब नाजर म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणारे श्री. निरज काकडे यांची केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे प्रशासकीय जनसंपर्क अधिकारी (PRO)  म्हणून नियुक्ती झाली आहे.

श्री. नीरज काकडे यांनी तहसील कार्यालयात नायब नाजर पदावर कार्यरत असताना प्रशासनिक कार्यक्षमता व प्रामाणिकपणे सेवा देऊन नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या कार्यशैलीची दखल घेत, आता त्यांना मंत्र्यांचे प्रशासकीय जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्री. नीरज काकडे यांनी आपल्या नवीन भूमिकेत सर्वसामान्य लोकांच्या कामांना अधिक जोमाने आणि उत्कृष्टतेने हाताळण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे चिखली आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सदिच्छा व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, "प्रशासकीय स्तरावर माझी जबाबदारी मोठी आहे, आणि ती जबाबदारी मी संपूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन." चिखली तहसील कार्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांच्या नवीन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

0 Comments