"water leakage" : चिखलीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ जलटाकीची गळती; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय !

 गेल्या तीन तासांपासून जोरदार पाणीगळती ; मुख्य रस्त्यावरून पाणी वाहतंय

काँग्रेसतर्फे दोषींवर त्वरित कारवाई व गळती रोखण्याची मागणी



चिखली/(छोटू कांबळे) —  छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, चिखली येथे असलेल्या जलटाकीतून चिखली शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मागील तीन तासांपासून ही टाकी भरताना भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असून, तीव्र दाबाने पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच चिखली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर यांनी तात्काळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. बिडगर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्या घटनेला दोन तास उलटून गेले तरी पाणीपुरवठा विभागाचा एकही कर्मचारी अद्याप घटनास्थळी दाखल झालेला नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.               या ढिसाळ आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा राहुल सवडतकर यांनी तीव्र निषेध केला आहे. “शहरात अनेक भागांमध्ये नियमित पाणीटंचाई असताना असे लाखो लिटर पाणी वाया जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व जलगळती थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाच्या या हलगर्जीपणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत, तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे.

राहुल सवडतकर यांचा प्रशासनावर निषेधाचा सूर



"छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळील जलटाकीतून गेल्या तीन तासांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळत आहे. मी स्वतः दोन तासांपूर्वी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. बिडगर यांच्याशी संपर्क साधला, तरीही अद्याप पाणीपुरवठा विभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेला नाही. शहरात अनेक भागांमध्ये नागरिकांना नियमितपणे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे हे अत्यंत गंभीर व दुर्दैवी आहे. हे प्रशासनाचे अपयश असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि पाणी गळती थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, ही आमची जोरदार मागणी आहे."


Post a Comment

0 Comments