बुलढाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी ; सर्वांचे लागले लक्ष
सकाळी ८ वाजता सुरू होईल मतमोजणी, दुपारपर्यंत अपेक्षित निकाल
बुलढाणा /( द बातमीवाला ) : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर काल २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यावेळी मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. हा निवडणूक निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून शनिवारीच विजयाचे फटाके फुटणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये चिखली, बुलढाणा ,मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर व सिंदखेडराजा या मतदार संघाचा समावेश आहे. या सातही विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या २१,३४,५०० आहे. यामध्ये पुरुष मतदार ११ लाख ९ हजार ७१९ तर महिला मतदार दहा लाख २४ हजार ६७१ आहेत. यामध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या ही ३८ आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या १७९२३ आहे. यासाठी एकूण २२८८ मतदान केंद्र होते. झालेल्या मतदानानंतर आता २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतमोजणीचे ठिकाण खालील प्रमाणे आहे.
१ ) बुलडाणा :- निवडणूक आयोग इमारत, तहसीलच्या मागे२) चिखली :- तालुका क्रीडा संकुल, चिखली३) खामगाव :- जे. व्ही. मेहता नवयुग विद्यालय रेल्वे स्टेशनच्या मागे४) मलकापूर :- कृषि उत्पन्न बाजार समिती, बेलाड, घीर्णी रोड५)जळगाव जा. :- प्रशासकीय इमारत एसडीओ कार्यालय६ ) सिं. राजा :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार७ ) मेहकर :- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्र. ५.
0 Comments