कपिल खेडेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

चिखलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का ; कपिल खेडेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश 

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात कपिल खेडेकर शिंदे गटात






चिखली (द बातमीवाला): शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हा प्रमुख कपिल खेडेकर यांनी काल दि . 31 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आज, 1 जानेवारी 2025 रोजी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने चिखली विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.                                            कपिल खेडेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करणारे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला. खेडेकर यांच्या या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटात कपिल खेडेकर यांचा समावेश झाल्याने या गटाच्या स्थानिक प्रभावीतेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिखलीमध्ये झालेला हा पक्ष बदल शिवसेना उध्दव गटासाठी एक मोठा धक्का ठरला आहे, कारण खेडेकर हे या गटाचे प्रमुख नेते होते आणि त्यांचा राजकीय प्रभाव मोठा होता. कपिल खेडेकर यांनी आपल्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या वळणाची दारे उघडली आहेत, आणि त्यांच्या या कदमामुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता  वर्तवली जात आहे.



Post a Comment

0 Comments