नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना !

चिखली : विद्यार्थ्यांना तासन् तास बस न मिळाल्याने सुरक्षिततेची चिंता 

संध्याकाळी विद्यार्थ्यांना बस मिळाल्यानंतर गावकडे रवाना



चिखली /( द बातमीवाला ): नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज १ जानेवारी २०२५ रोजी चिखली एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थ्यांना तासन् तास बस न मिळाल्याने मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. चिखली आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दुपारी व संध्याकाळी एसटी बसची वाट पाहत होते.                         सैलानी आणि नायगाव मार्गावरील एसटी बसच्या दोन फेऱ्या आज रद्द झाल्या. परिणामी, सोनेवाडी, सातगाव, भुसारी, शेलगाव जहागिरी, खंडाळा मकरध्वज आणि पेन सावंगी येथील विद्यार्थी बस थांब्यावर ताटकळत बसले. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी एसटी डेपोमध्ये धाव घेतल्यावर, आगार व्यवस्थापक जोगदंडे यांनी साडेसहा वाजता बस उपलब्ध केली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी घराच्या दिशेने प्रस्थान केले. परंतु, एसटी महामंडळाच्या या नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.    पालक आणि विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळाकडून वेळेवर सर्व नियोजित फेऱ्या सोडण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित होईल.



Post a Comment

0 Comments