चिखलीत फुले-आंबेडकर जयंती समितीची 2025 साठी कार्यकारणी जाहीर !

फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी श्रीकांत शिनगारे यांची निवड

चिखली/( छोटू कांबळे ) : चिखली शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने 05 मार्च रोजी झालेल्या बैठकीत फुले-आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी श्रीकांत शिनगारे या युवा सामाजिक कार्यकर्त्याची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष श्रीकांत शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत समितीची कार्यकारणी घोषित करण्यात आली.
या कार्यकारिणीत प्रा. मिलिंदकुमार मघाडे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून दुर्गाताई चव्हाण, अँड. वैशाली भंडारे, तेजस्विनी सतीश गवई, वंदना सुरडकर, संगीताताई लहाने, नंदाताई वाकोडे, वर्षाताई घोरपडे, मायाताई कस्तुरे, ज्योतीताई वानखडे, सिद्धार्थ धंदरे, शंकरराव जाधव, राहुल पवार, बाळू जाधव, डॉ. विजय साळवे, सुशीलकुमार राऊत, बिपीन इंगळे, शिवा इंगळे, विनोद बोर्डे, हर्षल जाधव, राजेश खंडारे,छोटू कांबळे, संकेत जाधव, विशाल जाधव, धनंजय हिवाळे आणि अक्षय भंडारे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी विशाल खरात, सहसचिवपदी विलास जाधव, कोषाध्यक्ष प्रवीण खरात, सहकोषाध्यक्ष मिलिंद हिवाळे, संघटक प्रकाश साळवे व सहसंघटक म्हणून
विनोद कळसकर , राजेश बोर्डे, विशाल भंडारे, राम सुरडकर, बबलू शेख, कुणाल तरमळे यांची निवड झाली. प्रसिद्धीप्रमुख म्हणून प्रताप मोरे , छोटू कांबळे, संजय निकाळजे, प्रशांत डोंगरदिवे, भारत जोगदंडे, , कैलास इंगळे, विशाल गवई, महिंद्र हिवाळे, किरण शेजुळ यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. अध्यक्ष श्रीकांत शिनगारे व सामाजिक जेष्ठ नागरिक यांच्या आदेशानुसार ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून फुले-आंबेडकर जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्य एकत्रित काम करतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




Post a Comment

0 Comments