चिखलीत महिलांसाठी 'हक्काचे भवन': श्वेताताईंची दूरदृष्टी !

"बचतगट भवन"... प्रत्येक गावात देणार सौ. श्वेताताई महाले

महिलादिनी घेतला वसा, महिलांनो हक्काच्या 'भवनात' येऊन बसा....



चिखली /( छोटू कांबळे ) - नुकताच जागतिक महिला दिन सर्व जगभरात साजरा झाला.या दिवसानिमित्त सर्वांच्या भाषणातून जगातील सर्व महिलांची कौड कौतुके करण्यात आली.परंतु महिलांच्या खऱ्या समस्या काय आहे? आणि त्या समस्या मधून बाहेर पडण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी काय करता येईल? याचा विचार मात्र सहसा कुणी करताना दिसत नाही.मात्र चिखलीच्या आमदार विकासकन्या सौ. श्वेताताई यांनी आपल्या मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक,सामाजिक उन्नतीसाठी आणी सक्षमीकरणासाठी एक दमदार पाऊल उचलायचे ठरवले असून,त्यांचा हा संकल्पित प्रकल्प जर यशस्वी ठरला तर तो राज्यातील एक मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे.

आ. सौ. श्वेताताई महाले यांनी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करताना एक बाब जवळून बघितली की ग्रामीण भागातील महिलांकडे आपल्या वैयक्तिक व सामाजिक उन्नतीसाठी अनेक कल्पना असतात परंतु या विविध नाविण्यपूर्ण कल्पनाची देवाणघेवाण होत नसल्याने त्यांना मूर्त स्वरूप येत नाही.ग्रामीण भागातील बचत गटातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसल्यानेे त्यांच्याकडे एकत्र जमण्यासाठी,वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी व महिलांना महिलांच्या विषयावर बोलण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही,पण या महिलांना जर एक हक्काची जागा मिळाली तर या महिला आपल्या विचारांना मोकळ्या पद्धतीने व्यक्त करू शकतील. बचतगटातील महिलांना एकत्र येऊन बचत, कर्ज आणि इतर सामाजिक उपक्रमांसाठी एक जागा उपलब्ध करून दिली तर त्या सक्षम होतील. व त्यांना सामाजिक प्रगतीचा एक भाग बनता येईल.या उदात्त विचाराने प्रेरित होऊन आमदार सौ.श्वेताताई महाले यांनी प्रत्येक गावामध्ये एका बचत गट भवनाची निर्मिती करण्याचे संकल्पित केले आहे.
बचत गट भवन काय आहे?तर एक सामुदायिक जागा!बचत गट भवन म्हणजे महिला बचतगटांच्या सदस्यांसाठी एक सामुदायिक जागा, जिथे ते एकत्र येऊन बैठका घेऊ शकतात, बचत करू शकतात, कर्ज घेऊ शकतात आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात!या भवनामुळे महिलांना एकत्र येऊन योजना बनवण्यास, एकमेकांना मदत करण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होते. बचत गट भवन केवळ आर्थिक विकासासाठीच नाही, तर सामाजिक विकासासाठीही मदत करते,जसे की आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरणासारख्या समस्यांवर चर्चा करणे आणि त्यावर उपाययोजना करणे.महिला बचतगटांना बचत करण्यासाठी आणि कर्ज घेण्यासाठी मदत करणे, तसेच त्यांना व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणे. 
 एक काठी तोडणे सहज शक्य आहे परंतु काठींची मोळी बनवली तर ती तोडणे शक्य नसते.बचत गट भवन महिलांना एकत्र येऊन काम करण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची संधी देतात, ज्यामुळे सामाजिक विकास साधता येतो. 
बचत गट भवन महिला बचतगटांसाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे, जे त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करते.अशा आवश्यक वास्तुची निर्मिती प्रत्येक ग्रामस्तरावर होणे अत्यंत गरजेचे असून,त्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांनी एका पायलट प्रोजेक्टदवारे प्रत्येक ग्रामस्तरावर महिला बचतगट भवनाची निर्मिती करण्याचे ठरवले असून,महिला सक्ष्मीकरणाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरेल यात काहीच शंका नाही.

Post a Comment

0 Comments