गुलाबराव मोरे यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन, चिखलीत उद्या होणार अंत्यसंस्कार
चिखली /( छोटू कांबळे) - चिखली येथील आंबेडकरी चळवळीचा धगधगता ज्वालामुखी, नागसेन बुद्ध विहार समितीचे संस्थापक अध्यक्ष गुलाबरावजी मोरे यांचे आज, दिनांक 28 मार्च 2025 रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
गुलाबरावजी मोरे यांनी आपल्या कार्यकुशलतेने व अथक प्रयत्नांतून फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला गतिमान करण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम उद्या, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता बौद्ध स्मशानभूमी, चिखली येथे होणार आहे. सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराने नोंद घ्यावी.
समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या भीम योद्ध्याला अखेरचा "जय भीम"
0 Comments