चिखलीत उद्या प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे मार्गदर्शन
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुवर्णसंधी
चिखली/( छोटू कांबळे ) : सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५, चिखली यांच्या वतीने ९ ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत फुले–आंबेडकर वाटिका, चिखली येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात उद्या दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे सर यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने होणार आहे. या कार्यक्रमात प्रा. कांगणे सर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, योग्य अभ्यासक्रमाची निवड आणि वेळेचे नियोजन यासंदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. प्रा. विठ्ठल कांगणे सर हे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाच्या क्षेत्रात आपले नाव कमावलेले तज्ज्ञ असून त्यांनी महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून यशस्वी बनवले आहे. त्यांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी ठोस दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अनोखी संधी असून या मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चिखलीतील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंती उत्सव समितीने केले आहे.
0 Comments