आ.सौ.श्वेताताई महाले निर्णायक हस्तक्षेप – अपात्र ठरवलेल्या हजारो शेतकऱ्यांना मिळणार विमा लाभ !
श्वेताताईंनी दिला शब्द, सरकारने मान्य केली मागणी
चिखली/( द बातमीवाला/ छोटू कांबळे) :- खरीप 23-24 व रब्बी 23-24 मधील हंगामात कृषी विमा कंपनीकडून अवास्तव निकष लावून ज्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, कृषी पीक विमा कंपनीचा भ्रष्टाचार विधानसभेच्या पटलावर मांडणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून 2023 24 मधील खरीप व रब्बी हंगामात जे शेतकरी कंपनीने अपात्र दाखवले होते त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची उर्वरित पीक विम्याची रक्कम अदा करण्यात येणार असल्याबद्दल शासकीय स्तरावरून आदेश देण्यात आले आहेत.
सप्टेंबर 2024 मध्ये धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना बुलढाणा जिल्ह्यातील तत्कालीन आमदारांची त्यांच्या कॅबिनेटला बैठक झाली होती.जे आमदार या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते त्यांना झूम वरून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीसाठी उपलब्धता करून देण्यात आली होती. माजी कृषी मंत्री यांच्यासोबत झालेल्या या बैठकीमधये चिखलीच्या तत्कालीन व विद्यमान आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांनी कृषी विमा कंपनीने चुकीचे निकष लावून शेतकऱ्यांना विमा नाकारला असल्याची तक्रार केली होती.व आपल्या मतदारसंघातील तसेच राज्यातील पात्र असलेल्या परंतु कंपनीने चुकीचे निकष लावून रद्दबादल केलेल्या अनेक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी कृषिमंत्री यांनी घ्यावी याबाबत विनंती केली होती.त्यानंतर सौ. श्वेताताई महाले यांनी ह्या गोष्टीचा सतत पाठपुरावा केला आणी त्याचीच फलश्रुती म्हणून विमा कंपनीने चिखली विधानसभा मतदाररसंघातील 2023-24 च्या खरीप हंगामातील सुमारे ज्या 3901 शेतकऱ्यांना अपात्र केले होते, 2023- 24 च्या रब्बी हंगामातील सुमारे 6728 अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना/शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आले असून त्यांना त्यांचा त्या काळातील पिक विमा रक्कम सुद्धा प्राप्त होणार आहे.
विमा कंपनीने लावलेले निकष कशा प्रकारे चुकीचे आहेत व या नियमाद्वारे किंवा या निकषाद्वारे शेतकऱ्यांची कशाप्रकारे पिळवणूक होत आहे.अस्मानी संकटाने ग्रासलेल्या शेतकऱ्याला पीकविमा कंपन्या सुलतानी संकटात ढकलतात व त्याचा आरोप मात्र सत्ताधार्यावर केला जातो.त्यामुळे सरकारची नियत ही अतिशय प्रामाणिक व शेतकऱ्यांना प्रति अतिशय संवेदनशील असून महायुती सरकारकडून शेतकरी हा विषय नेहमीच आदराचा व सर्वोच्च प्राथमिकतेचा असल्याचे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
0 Comments