अवकाळीमुळे चिखली शहराचा वीजपुरवठा खंडित ; महावितरणची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू
चिखली /( छोटू कांबळे ) : चिखली शहरात आज (दि. ३ एप्रिल) सकाळी वादळी वाऱ्यासह अवघ्या १५ मिनिटांच्या पावसाने काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून अनेक ठिकाणी लाईट गुल असून, दुपारचे २ वाजले तरीही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही.
महावितरणचे चिखली शहर अधिकारी भुसारी व कर्मचारी सतत युद्धपातळीवर कार्यरत असून, वीजपुरवठा खंडित करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. मात्र, नेमका फॉल्ट कुठे आहे, याचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ लाईट नसल्याचा सामना करावा लागू शकतो. वादळामुळे विद्युत खांब व तारांवर मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. महावितरणने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, तांत्रिक अडचण दूर होताच वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
0 Comments