Accident : चिखली-खामगाव रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

 

चिखली : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर



चिखली /( द बातमीवाला ): चिखली-खामगाव मार्गावर सोमठाणा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव शंकर भोपळे (वय ४०, रा. तेल्हारा पेठ) असे असून, सोमवारी आज  दि. १२ मे दुपारी १ वाजता हा दुर्दैवी अपघात घडला.

दुचाकीस्वार शंकर भोपळे हे एच एफ डिलक्स (HF Deluxe) दुचाकीवरून चिखलीहून आपल्या गावी तेल्हारा जात असताना, पाठीमागून वेगाने येणाऱ्या म्हणून 08 एस 8786 क्रमांकाच्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोपळे रस्त्यावर फेकले गेले व त्यांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृताच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments